Navri Sathi 40 + Marathi Ukhane

0
429
views
0Shares

Namaskar mitarano aplya laganath kiva kontyahi pujet aplya navain navari sathi marathi ukhane navari he kiva navri sathi ukhane marathi he lagatch he thumhi kontyahi karykramat he marathi ukhane navari sathi navae gevu shakta. tar mitarano tumhala kashe vatale he ukhane in marathi comedy he nakki sanga.

Navariche Ukhane in Marathi

marathi ukhane navari.

1.मैत्रि आणी नात्यात नसावा स्वार्थ,
— मुळेच माझ्या जीवनाला अर्थ…

1.मैत्रि आणी नात्यात नसावा स्वार्थ,
— मुळेच माझ्या जीवनाला अर्थ…
2.
रंगबेरंगी रांगोळ्यांनी पंगतीला शोभा येते
लाडूचा गोड घास —– रावांना देते
3.
मंगळागौरीची पूजा मनोभावे करते
—– रावांसाठी दीर्घायुष्य मागते
4.
चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल
—– रावांच्या जीवनात टाकते पहिले पाऊल
5.
नातेवाईक जमले केले मोलाचे आहेर
—– रावांच्या सहवासासाठी सोडले मायेचे माहेर
6.
उंबरठयावरचं माप पायांनी लोटते
—– रावांच्या घरात भाग्याने प्रवेश करते
7.
आई, बाबा येते आशीर्वाद दयावा
—– रावांचा सहवास जन्मभर लाभावा
8.
—– रावांच्या बरोबर मन गेले गांगरुन
आईबाबांच्या आशिर्वादाची शाल घेते पांघरुन
9.
मोत्याची माळ, सोन्याचा साज
—– रावांचे नाव घेते मंगळागौर आहे आज
10.
मंगळागौरी माते नमन करते तुला
—– रावांचे अखंड सौभाग्य लाभू दे मला
11.
कामाची सुरवात होते श्रीगणेशापासुंन
……..नाव घेयला सुरवात केली आजपासून
12.
जेथे सुख शान्ति समाधान तेथे लक्ष्मिचा वास
..रावान्ना भरविते श्रीखंडाचा घास आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास
— ला भरविते जिलेबिचा घास
13.
कळी हसेल फुल उमलेल, मोहरुन येईल सुगन्ध,
….. च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद
14.
नवीन नवरी साठी उखाणा…
आकाशाच्या प्रागंणात ब्रन्हाविश्नु आणि महेश ,
……च नाव घेवुन करते मि ग्रुह प्रवेश…
15.
उन्हाळ्या चे दिवस आले झाली लग्ने सुरु..
…रावांचे नाव घेऊन केला आमचा संसार सुरु..!
16.
आमच्या ह्यांचे घर होते लाकडाचे…
आमच्या ह्यांचे घर होते लाकडाचे…
…….. नाव घेते सासू बाईंच्या माकडाचे.
17.
अस्सल सोने चोविस कँरेट
———- अन माझे झाले आज मँरेज
18.
इंग्रजी भाषेत चहाला म्हणतात टी
सौ….चे नाव घेण्यास लागते डबल फी !!!!!
19.
गंगेची वाळू चाळ्णीने चाळू
चलचल ——– आपण सारीपाट खेळू
20.

ukhane in marathi comedy, long marathi ukhane for female,


मातीच्या चुली घालतात घरोघर
——– झालीस माझी आता चल बरोबर
21.
सूपभर सुपारी निवडू कशी, गळ्यात माळ वाकु कशी, पायात पैंजण चालू कशी,
…….. बसले मित्रपाशी, कपाटाची चावी मागू कशी…??
22.
चंदनाच्या झाडावर बसला मोर
—– रावांच्या जीवावर मी आहे थोर
23.
चंद्राचा उदय, समुद्राला भरती
—– रावांच्या शब्दांनी सारे श्रम हरती
24.
सूख समाधान तिथे लक्ष्मीचा वास
—– रावांना देते मी जिलेबीचा घास
25.
पदस्पर्शाने लंवडते उंबरठ्यावरलं माप
—– रावांची भाग्यलक्ष्मी म्हणुन ग्रुहप्रवेश करते आज
26.
घराला असावं अंगण, अंगणात डोलावी तूळस
—– रावांच्या जीवनात चढवीन आंनदाचा कळस
27.
सूख दू:खाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले
—– रावांच्या सहवासात भाग्य माझे हसले
28.
अंलकारात अंलकार मंगळसूत्र मूख्य
—– रावांचा आनंद हेच माझे सौख्य
29.
मंगळ्सूत्र हा सौभाग्याचा अंलकार
—– रावांच्यासह ध्येय, आशा होवोत साकार
30.
आकाशाच्या पोटी चंद्र, सूर्य, तारांगणे
—– रावांचे नाव घेते तूमच्या म्हणण्याप्रमाणे
31.
सीतेची पतिभक्ती, सावित्रीचा निग्रह
—– रावांचे नाव घेण्यास नको मला आग्रह
32.
लाल चूटूक मेंदी, हिरवागार चुडा
—– रावांसाठी जीव झाला माझा वेडा
33.
आनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवर
आयुष्याचा प्रवास करीन —– रावांच्या बरोबर
34.
आकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा
—– राव पति मिळाले हाच भाग्योदय खरा
35.
सोन्याच्या साखळीत खुलतात काळे मणी
—– राव झाले माझ्या सौभाग्याचे धनी
36.
मनोभावे प्रार्थना करुन पुजला गौरीहर
—– रावांचा सहवास लाभो जन्मभर
37.
प्रेमाचा दिला हुंडा, मानाची केली करणी
जीवनाचे पूष्प वाहिले —– रावांच्या चरणी
38.
चांदीच्या ताटात पक्वानांची रास
—– रावांना देते लाडूचा घास
39.
नीलवर्ण आकाशात चमकतात तारे
—– रावांचे नाव घेते लक्ष दया सारे
40.

ukhane in marathi comedy, long marathi ukhane for female,


सांयकाळ्चे वेळी नमस्कार करते देवाला
—– रावांचे नाव घेताना आनंद होतो मनाला
41.
इग्रंजी भाषेत चंद्राला म्हणतात मून
—– रावांचे नाव घेते —– ची सून
42.
खडीसाखरेचा खडा खावा तेव्हा गोड
—– रावांचे नाव अम्रुतापेक्षा गोड
43.
इग्रंजी भाषेत आईला म्हणतात मदर
—- रावांचे नाव घेते सोडा माझा पदर
44.
फुलात फुल जाईचे फुल
—– रावांनी घातली मला भूल
45.
साता जन्मीची पूण्याई फळाला आली आज
—– रावांच्या हाताने ल्याले मंगळ्सुत्राचा साज
46.
पत्रिका जुळ्ल्य़ा योग आला जूळून
—– राव पती मिळावे म्हणून नवस केला कुलदेवतेला स्मरुन
47.
संसार सागरात प्रीतीच्या लाटा
—– रावांच्या सुखदु:खात उचलीन मी अर्धा वाटा
48.
आईवडिलांच्या आशिर्वादाने आला भाग्याचा दिवस
—–राव पति मिळावे म्हणुन कुलदेवतेला केला नवस

Namaskar mitarano aplya laganath kiva kontyahi pujet aplya navain navari sathi marathi ukhane navari he kiva navri sathi ukhane marathi he lagatch he thumhi kontyahi karykramat he marathi ukhane navari sathi navae gevu shakta. tar mitarano tumhala kashe vatale he ukhane in marathi comedy he nakki sanga.

0Shares

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here